Mumbai News : बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

एमपीसी न्यूज – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (shivsena Chief Balasaheb Thackeray) यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे (statue ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज, शनिवारी अनावरण करण्यात आले.

बाळासाहेबांच्या 95 व्या जयंती ( Balasheb 95th jayanti) निमित्त दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील फोर्ट ( Mumbai, Fort) परिसरात हा सोहळा पार पडला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी दिग्गज सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. शरद पवार (sharad Pawar), देवेद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राज ठाकरे (Raj Thackeray) , आदित्य ठाकरे, प्रविण दरेकर, रश्मी ठाकरे, संजय राऊत व इतर दिग्गज मंडळी मंचावर उपस्थित होते.

जेष्ठ मूर्तिकार शशिकांत वडके यांनी बाळासाहेबांचा 9 फुटांचा ब्रॉंजचा पुतळा साकारला आहे. बाळासाहेबांच्या 95 व्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.