Mumbai News : कोरोना चाचण्यांचे दर घटले; 980, 1400, 1800 नवे दर

एमपीसीन्यूज : खासगी प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर कमी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार प्रती तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे नव्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1  हजार 400 आणि 1 हजार 800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.

यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाहीत. तर, 4  हजार 500 रुपयांवरुन 980 रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले राहवत. या मध्ये प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रुपये दर आकारण्यात येईल.

कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी 1  हजार 400  रुपये, तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1  हजार 800 रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे.

सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट करुन रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचेही आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात असून, प्रती 10 लाख लोकसंख्येमागे 70  हजार चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्या वाढविण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत.

राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.