Mumbai news: उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त; ब्रीच कॅन्डीतून डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. पवार आज (सोमवारी) कोरोनामुक्त झाले असून त्यांना ब्रीच कॅन्डीतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

अजित पवार यांना 26 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आठ दिवस उपचार घेऊन त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुढील आठ दिवस ते आराम करणार असून त्यानंतरच ते बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या सुरुवातीपासून अजित पवार बाहेर पडून काम करत होते. राज्यभर फिरत होते. पुण्यात दर शुक्रवारी बैठक घेऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.