Mumbai News : देवेंद्र फडणवीस झाले कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुक्त असून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

24 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयाच्या बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादन केलं. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि माजी मंत्री गिरीश महाजनही होते.

देवेंद्र फडणवीस यांना पुढचे 10 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर होम क्वारंटाइन असणार आहेत. गेल्या रविवारी आणि सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली होती असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे सुप्रीटेंडंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले होते. डॉ. तात्याराव लहाने आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.