Mumbai News : प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना मुंबई पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध कार डिझायनर आणि डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करण्याच्या आरोपाखाली दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली आहे.

यासोबतच मुंबई पोलिसांनी त्यांची गाडीही जप्त केली असून या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने ही कारवाई केली असून या यूनिटचे प्रमुख सचिन वाजे यांच्या पथकाने अंधेरीच्या एमआयडीसी भागातून दिलीप छाब्रिया यांना अटक केली.

पोलिसांनी छाब्रिया यांच्यावर आयपीसीच्या कलम 420, 465, 467, 468, 471, 120 बी आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

मुंबई पोलिसांच्या मुख्यालयात दिलीप छाब्रियांची एक स्पोर्ट्स कार पार्क करण्यात आली आहे. छाब्रीया यांच्यावर नेमकी कोणत्या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली याचा तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.