Mumbai News : प्रसिद्ध क्रिकेट समालोचक डीन जोन्स यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन

जोन्स यांच्या निधनाने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे.

एमपीसीन्यूज : प्रसिद्ध क्रिकेट समालोचक डीन जोन्स यांचे आज, गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते 59  वर्षांचे होते. जोन्स यांच्या निधनाने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज असलेले डीन जोन्स IPLमधील एक प्रसिद्ध समालोचक होते. आज, गुरूवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले.

_MPC_DIR_MPU_II

‘डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले. अचानक गुरूवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आणि त्यांचा मृत्यू झाला. जोन्स यांच्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांशी संपर्क साधत आहोत’ अशी माहिती स्टार इंडियाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

जोन्स यांच्या निधनाचे वृत्त समजताच मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, विरेंद्र सेहवाग, इरफान पठाण आदींसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आणि चाहत्यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला. तसेच त्यांना आदरांजली वाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.