Mumbai News : अखेर अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज – अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सूपूर्द केला आहे.

याविषयी माहिती देताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं, परमवीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख शरद पवारांना भेटले. सीबीआय चौकशी करणार असेल तर मी राजीनामा देऊ इच्छितो असं अनिल देशमुखांनी पवारांना सांगितलं. त्याला पवारांनी होकार दिला. गृहमंत्री पदाची जबाबदारी सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. यावेळी न्यायालयाने 15 दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.