Mumbai news: मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज – मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे आज (बुधवारी) कोरोनामुळे निधन झाले आहे. एकनाथ गायकवाड हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते.

एकनाथ गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. मुंबईत काँग्रेस वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. आमदार, खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.