Mumbai News : बॉलिवूड कोरोनाच्या विळख्यात, कटरिनालाही झाली कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – बॉलिवूड कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. गेल्या दोन दिवसांत खिलाडी अक्षय कुमार, गोविंदा, विकी कौशल, आदित्य नारायण यांना कोरोनाची लागण झाली. आता बॉलिवूडची चिकनी चमेली कटरिना कैफ हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, ‘कटरिना कैफ हिला कोरोनाची लागण झाली असून, ती सध्या होम क्वारंटाईन आहे’

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस देशात वाढणा-या कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एक लाखाच्या घरात पोहोचली आहे. राजकीय नेते मंडळी, कलाकार ते मैदानावरील खेळाडू संक्रमित होत आहेत.

दरम्यान, अक्षय कुमारची चाचणी सकारात्मक आल्यानंतर तो घरीच होम क्वारंटाईन होता. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून तो रुग्णालयात दाखल झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.