Mumbai News : अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेवर आयकर विभागाचे छापे

एमपीसी न्यूज – मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून आज गुरुवारी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कार्यालयांवर आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर छापे टाकले आहेत.

सकाळी सात वाजल्यापासून साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर कारखाना, नगरमधील अंबालिका आणि नंदूरबारमधील पुष्पदंतेश्वर या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत.

या छापेमारीत पवार यांच्या बहिणींच्या घराची देखील आयकर अधिकाऱ्यांनी झडती घेतल्याचे म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.