KGF 2 TEASER : केजीएफ चॅप्टर-2चा दमदार टिझर प्रदर्शित

0

एमपीसी न्यूज – तुफान यश आणि लोकप्रियता मिळालेल्या ‘केजीएफ’ या चित्रपटाच्या दुस-या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. ‘केजीएफ चॅप्टर 2’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 20 तासांत या चित्रपटाच्या टिझरला 5.9 कोटी व्हिव्हज् मिळाल्या आहेत तर 37 लाख लाईक मिळाल्या आहेत.

होमबेल फिल्म्सच्या युट्यूब चॅनेलवर गुरूवारी (दि.7) रात्री साडे नऊ वाजता हा टीझर प्रदर्शित झाला. दाक्षिणात्य अभिनेता यश, संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार या चित्रपट मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘केजीएफ चॅप्टर -1’ हा चित्रपट ज्या ठिकाणी संपला तेथूनच पुढे केजीएफ चॅप्टर 2 ची कथा सुरु होते. टिझरमध्ये यश दमदार स्टाइलमध्ये झळकला आहे.

या चित्रपटात अभिनेत्री रविना टंडन एका राजकीय व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार असल्याचं दिसून येत आहे. संजय दत्तचीदेखील झलक या टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.