Mumbai News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

एमपीसी न्यूज – माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार 31 मे 2021) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

अनपेक्षितरित्या घडलेल्या या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्वत: फडणवीस यांनी याबाबतचे ट्विट करुन माहिती दिली आहे.

कोरोना महामारीबरोबरच राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. त्यातच आज अचानक घडून आलेल्या फडणवीस आणि पवार यांच्या भेटीचे अनेक राजकीय अर्थ लावले जात असून त्यासेबतच राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचं प्रकरण या सर्व विषयांवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.