Mumbai News : परवानाधारक खासगी कार चालकांना मालवाहू टेम्पो चालवण्यास परवानगी

एमपीसी न्यूज – परवानाधारक खासगी कार चालकांना मालवाहू टेम्पो चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आयुक्त अविनाश ढाकणे यांनी याबाबत आदेश काढला आहे. हा आदेश महाराष्ट्रातील 50 क्षेत्रीय वाहतूक विभागांकडे पाठवण्यात आला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, यापूर्वी ट्रान्सपोर्ट आणि नॉन ट्रान्सपोर्ट असे दोन वेगवेगळे परवाने दिले जात असतं. मात्र, यापुढे ‘वाहनांच्या वर्गासाठी’ परवाना ग्राह्य धरला जाईल.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार लाईट मोटार व्हेईकल (एलएमव्ही) या प्रकारातील वाहन चालवण्यासाठी चालकाला दोन वेगवेगळ्या परवान्याची गरज भासणार नाही. रिक्षा, कार, कॅब, मिनी बस व एसी कार चालवण्यासाठी परवान्याव्यतिरिक्त बॅज आवश्यक आहे. वाहतूक विभाकडून तो बॅज मिळवता येईल.

या बाबतचा निर्णय ब-याच दिवसांपासून प्रलंबित होता. याला आता परवानगी देण्यात आली असून, नागरिक एलएमव्ही प्रकारातील वाहन चालवण्यासाठी एकच परवाना वापरू शकणार आहेत असे, ढाकणे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.