Mumbai News : कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास लॉकडाऊन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसीन्यूज : कोरोना रुग्ण वाढत राहिल्यास राज्यात लॉकडाऊन करावा लागेल. एप्रिल अखेर पर्यंत सर्वानी संयम पाळावा. लॉकडाऊन अजून टळलेला नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, शुक्रवारी स्पष्ट केले.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ पूर्ण लॉकडाऊनच्या मी विरोधात आहे. पण, वाढत्या रुग्णांची संख्या आटोक्यात आली नाही तर, राज्यात कडक निर्बंध लावण्याशिवाय पर्याय नाही. येत्या दोन दिवसांत नियमावली जाहीर केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.’

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, हा विषाणू वेगवेगळे अवतार धारण करून संकटात टाकत आहे. तो आपली परीक्षा बघत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना त्याच्यासोबत धैर्याने लढण्याची आवश्यकता आहे.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, एका उद्योगपतीने सांगितले की लॉकडाऊन करायचा असेल तर आरोग्य सुविधा वाढवा. त्या वाढविल्या जात आहेतच. वर्षभरात आरोग्य सुविधा वाढविण्यात आली, ती आणखी वाढवत आहोत.

मात्र, हे करण्यासाठी जे सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा वाढवायला सांगितले त्यांना एवढच सांगणं आहे की, रोज किमान 50 डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा. कारण नुसते फर्निचरचे दुकान म्हणजे हॉस्पिटल नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.