Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्यावतीने पोलिसांना काव्यसंग्रहाचे वाटप

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे संयुक्त सरचिटणीस विशाल हळदणकर यांच्यावतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिक, पत्रकार, पोलीस अधिकारी, वकील, प्राचार्य, साहित्यिक, कलाकार, डॉक्टर, वरिष्ठ शासकीय अधिकारी यांना कवी कुसुमाग्रज यांच्या काव्यसंग्रहाचे वाटप करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अंधेरी (मुंबई ) परिसरातील जेष्ठ नागरिक, पत्रकार, पोलीस अधिकारी, वकील, प्राचार्य, साहित्यिक, कलाकार, डॉक्टर, वरिष्ठ शासकीय अधिकारी यांची भेट घेत हळदणकर यांचाहस्ते त्यांना कवी कुसुमाग्रज काव्यसंग्रह भेट देण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे चिटणीस संजय देवळे, भगवंत झिटे, उपचिटणीस रोहित बेंद्रे, राकेश गुरव, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश जगताप, बबन मानेरे, सचिन खंदारे, सुरज राठोड रत्नेश दुबे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.