Mumbai News : चित्रपटगृहे सुरु करण्याबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक – अमित देशमुख

एमपीसी न्यूज – अनलॉक 5.0 अंतर्गत 15 ऑक्टोबरपासून देशात 50 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे उघडण्यास संमती देण्यात आली आहे. यासाठी नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. राज्यात अजून सिनेमा गृह सुरू करण्यास परवानगी दिली नाही. महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरु करण्याबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे राज्यात शिथीलता देण्याआधी विचार केला जाईल मगच निर्णय घेतला जाईल.

गेल्या सहा महिन्यांपासून सिनेसृष्टी, नाट्यसृष्टी अडचणीत आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामुळे त्यांना त्यातून बाहेर काढू. त्यानंतर या समस्येतून मार्ग काढू. लवकरच यासंदर्भातलं चित्र स्पष्ट होईल, असे देशमुख यांनी सांगितले आहे.

नवरात्र, दसरा, दिवाळी हा चित्रपट, नाटकांसाठी मौसम असतो. त्यामुळे चित्रपटगृहं सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.