_MPC_DIR_MPU_III

Mumbai News : ऑनलाईन क्लासेस व परीक्षांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवा ; असीमकुमार गुप्ता यांचे निर्देश

एमपीसी न्यूज – राज्यभरात सध्या शाळा व महाविद्यालयांचे वर्ग व परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरु आहेत. सोबतच प्रामुख्याने आयटी व इतर क्षेत्रात देखील वर्क फ्रॉम होम सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी. अत्यावश्यक कामे असल्याखेरीज वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

राज्यात येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत शैक्षणिक वर्ग बंद राहणार आहेत. त्यामुळे शालेय वर्ग व परीक्षा तसेच इतर महत्वाच्या परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरु आहेत. या पार्श्वभूमिवर महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्यात यावी.

_MPC_DIR_MPU_II

तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून प्राधान्याने वीजपुरवठा करण्यात यावा. अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये.

देखभाल व दुरूस्तीचे काम अत्यंत आवश्यक असल्यास ऑनलाईन शैक्षणिक वर्ग व परीक्षांचा कालावधी टाळून कामे करण्यात यावे.

तत्पुर्वी महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधीत शैक्षणिक संस्थांशी समन्वय व संवाद साधून पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे नियोजन करावे व त्यासंबंधीची माहिती ‘एसएमएस’द्वारे संबंधीत वीजग्राहकांना देण्यात यावी, असेही निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.