Mumbai News : मनसुख हिरेण मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला ; डीआयजी शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणाऱ्या मनसुख हिरेण मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला आहे. एटीएसचे प्रमुख डीआयजी शिवदीप लांडे यांची फेसबुकवर एक पोस्ट लिहून हिरेण यांच्या मृत्यूचा उलगडा झाल्याचे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट मध्ये असं म्हटलं आहे की, ‘मनसुख हिरेण मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे धन्यवाद देतो. ज्यांनी दिवस रात्र एक करुन तपासात म्हत्वाची भूमिका बजावली. हि केस माझ्या आजवरच्या कार्यकाळातील सर्वात जटिल केस होती’ असं त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

या प्रकरणात मुंबई पोलीसचे निवृत्त पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे व नरेश धरे यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मनसुख हिरेण मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांच्या देखरेखीखाली सुरु होता. यापूर्वीच मुख्य आरोपी सचिन वाझे यांना मुख्य आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे हिरेण मृत्यू प्रकरणात आत्तापर्यंत एकूण तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.