Mumbai News : सर्वसामान्यांसाठी ‘या’ तारखेपासून सुरू होणार मुंबई लोकल सेवा

एमपीसी न्यूज: सर्वसामान्यांसाठी आता लवकरच लोकल सेवा सुरू करण्याचे निर्देश ठाकरे सरकारने दिले आहेत. 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिक लोकल सेवा वापरू शकणार आहेत. आत्तापर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींनाच लोकल सेवेचा वापर करण्याची परवानगी होती.

लोकल ट्रेनची सेवा 1 फेब्रुवारीपासून चालू होणार असून यावेळेस योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यासाठी राज्य सरकारतर्फे काही वेळा आखून देण्यात आल्या आहेत. यानुसार सकाळच्या पहिल्या लोकलपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 पासून ते दुपारी 4 पर्यंत व रात्री 9 पासून ते शेवटच्या लोकलपर्यंत सामान्य नागरिक प्रवास करू शकणार आहेत. याच्या व्यतिरीक्तच्या वेळेत मात्र परवानगी दिलेल्या प्रवर्गातील व्यक्ती प्रवास करू शकणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.