Mumbai News: रियाच्या घरावर एनसीबीचा छापा, झाडाझडती सुरु; सॅम्युअल मिरांडाला घेतलं ताब्यात

तपास यंत्रणांना रियाच्या मोबाइलमधून डिलिट करण्यात आलेले मेसेज मिळाले होते.

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीच्या घरावर छापा टाकला आहे. एनसीबीची टीम सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रियाच्या घरी दाखल झाली. रिया–शोविक ड्रग्ज प्रकरणी हा छापा टाकण्यात आला असून घराची झाडाझडती सुरु आहे. यावेळी मुंबई पोलीसही रियाच्या घरी पोहोचले आहेत. दरम्यान, एनसीबीने सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने सकाळी सॅम्युअल मिरांडाच्या घरावर धाड टाकली होती. सुमारे अडीच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने त्याला ताब्यात घेतलं आहे.

तपास यंत्रणांना रियाच्या मोबाइलमधून डिलिट करण्यात आलेले मेसेज मिळाले होते. यामध्ये रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यात अमली पदार्थाबाबत संवाद होते. रियाचा भाऊ शौविकचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचा संशय आहे.


एनसीबीने आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.