Mumbai News: रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी

मध्यरात्रीपासून राज्यात जमावबंदी लागू

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आज शनिवार मध्यरात्रीपासून राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री आठ ते सकाळी सात या कालावधीत पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येता येणार नाही. पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत.

राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमावबंदी लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य सरकारने नव्याने नियमावली जाहीर केली आहे. रात्री आठ वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सिनेमाहॉल, मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट देखील रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत बंद राहणार आहेत. रेस्टॉरंटच्या होम डिलिव्हरी आधी दिलेल्या आदेशानुसार सुरु राहणार आहेत.

मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. विना मास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. लग्न समारंभासाठी फक्त 50 जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर, अंत्यविधीसाठी 20 जणांना परवानगी देण्यात आली आहे.

कंटेन्मेंट झोन ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. शक्य तेवढ्या कामगारांना वर्क फ्रॉम होम द्यावे. शासकीय कार्यालयात मास्कशिवाय परवानगी नाही. लॉकडाउनचे पूर्वीचे 30 एप्रिलपर्यंत कायम केले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.