Mumbai News : आता रिक्षा वाचवणे तुमच्या हातात – बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त म्हणून डॉ.अविनाश ढाकणे यांची नियुक्ती झाली आहे. रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी ढाकणे यांची भेट घेऊन, रिक्षाचे भवितव्य तुमच्या हातात आहे तुम्ही रिक्षा व्यवसाय वाचवू शकतात अशी भावना व्यक्त केली.

नवनियुक्त परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, सामाजिक भान असलेले अधिकारी म्हणून ओळख आहे. पुण्यातील रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी मुंबईला ढाकणे यांची भेट घेतली व रिक्षाचालकांचे प्रश्नांबाबत चर्चा केली. आयुक्तांनी रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

डॉ. अविनाश ढाकणे यांना रिक्षाची प्रतिकृती देत, ‘आता रिक्षाचे भवितव्य तुमच्या हातात आहे, तुम्ही रिक्षा व्यवसाय वाचवू शकता’ अशी भावना बाबा कांबळे यांनी व्यक्त केली. यावेळी समर्थ शिक्षा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद तांबे, पुणे रिक्षा फेडरेशनचे प्रदीप भालेराव, सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनामुळे रिक्षाचालकांचे जगच बदलले आहे. रिक्षा व्यवसाय आणि रिक्षा चालक आर्थिक अडचणीत आहेत. रिक्षा व्यवसाय बाबत नव्याने धोरण ठरवावे लागेल आणि भविष्यात धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील तरच रिक्षा व्यवसाय जिवंत राहील, यासाठी प्रशासन पातळीवरील अधिकारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. असे मत यावेळी बाबा कांबळे यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.