Mumbai News: पार्थ इमॅच्युअर, त्याच्या मागणीला कवडीचीही किंमत नाही – शरद पवार

माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे'' असे पवार यांनी म्हटले आहे. : Parth Immature, his demand is not worth a penny - Sharad Pawar

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवारी) मुंबईत भाष्य केले आहे. ”नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. तो इमॅच्युअर आहे. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे”, असे पवार यांनी म्हटले आहे.

याबाबतचे वृत्त एका मराठी वाहिनीने दिले आहे.

सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या सव्वा महिन्यानंतर पार्थ पवार यांनी त्यात उडी घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्याचे निवेदन दिले होते.

यामुळे उपमुख्यमंत्री पुत्र पार्थचा महाराष्ट्र पोलिसांवर भरवसा नाही काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात होता.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ”माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. तो इमॅच्युअर आहे. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे.

कोणाला सीबीआय चौकशी करायची असेल. तर, कोणाचा विरोध नसावा”, असेही शरद पवार म्हणाले. दरम्यान, यावर पार्थ पवार यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.