Mumbai News : राज्यात मल्टिप्लेक्स, नाट्यगृह आणि सिनेमागृहांना परवानगी ; 5 नोव्हेंबरपासून 50 टक्के क्षमतेने सुरु होणार

एमपीसीन्यूज : सिने रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना संकटामुळे गेल्या सात महिन्यापासून बंद असलेली मल्टिप्लेक्स, नाट्यगृह आणि सिनेमागृहे उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार उद्या म्हणजेच शुक्रवारपासून ( दि. 5) राज्यातील सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत. 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व सिनेमागृहे मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहा सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला आले.

त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता जलतरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय कंटेनमेंट झोनबाहेरील योग केंद्र आणि इनडोअर क्रीडा प्रकरानांही राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापना सुरु करण्यास संमती देण्यात येत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

Maharashtra Government allows cinema halls, theatres, multiplexes to open with 50% of their seating capacity in areas outside containment zones from 5th November.

— ANI (@ANI) November 4, 2020

Yoga institutes outside containment zones and indoor sports allowed from 5th November in Maharashtra: State Government https://t.co/PebmEWV4Uo

— ANI (@ANI) November 4, 2020

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.