Mumbai News : राज ठाकरे यांच्यावर एक जूनला शस्त्रक्रिया; मंगळवारी लीलावतीमध्ये दाखल होणार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया करायची असल्याने ते उद्या (मंगळवारी) लीलावती रुग्णालयात दाखल होणार. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांना पायाचा दुखण्याचा त्रास सुरु आहे. त्यांच्यावर एक जून रोजी शस्त्रक्रिया होणार आहे.

राज ठाकरे पाच जूनला अयोध्येला जाणार होते. मात्र पायाचे दुखणे वाढल्याने राज ठाकरे यांना आयोध्या दौरा रद्द करावा लागला होता.त्यानंतर राज यांच्या पायाची शस्त्रक्रिया होणार असल्याचे निश्चित झाले. त्यानुसार उद्या ते लीलावती रुग्णालयात दाखल होणार असून एक जून रोजी शस्त्रक्रीया होणार आहे.

राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले होते की, एक जूनला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे इथे जाहिरपणे सांगतो कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रिया केली तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.

याचबरोबर जवळपास 35 वर्षे माझे वजन 63 किलो इतकंच होते. पण त्यानंतर वजन आणि इतर गोष्टी वाढायला लागल्या. आपण आरोग्यासंदर्भातील पथ्यपाणी खूप गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. मात्र, आपण आज करू,उद्या करू, या नादात कायम टाळाटाळ करत राहतो. मला सध्या त्रास होत असल्यामुळे मला या सगळ्याची जाणीव होत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.