Mumbai News: राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी ‘या’ 12 नावांची राज्यपालांकडे शिफारस

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडीने आज (गुरुवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवायच्या बारा जणांची यादी सोपविली आहेत. त्यामध्ये शिवसेना चार, राष्ट्रवादी काँग्रेस चार आणि काँग्रेसकडून चार जणांची शिफारस करण्यात आली आहे. आता राज्यपाल या नावांना मंजुरी देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या 12 सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवायच्या उमेदवारांची यादी भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवली.

यादीत यांच्या नावांची शिफारस

शिवसेना – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, उपनेते नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस – माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी खासदार राजू शेट्टी, यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे आणि काँग्रेसकडून प्रवक्ते सचिन सावंत, माजी खासदार रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन, अनिरुद्ध वणगे यांच्या नावाची शिफारस केली असल्याचे वृत्त मराठी वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III