Mumbai News : अखेर संजय राठोड यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्याकडे सोपवला राजीनामा

एमपीसी न्यूज – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सूपूर्द केला.

संजय राठोड हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी आपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सूपूर्द केला. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर शनिवारी सकाळी संजय राऊत यांनी सूचक विधान केलं होतं. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन!’. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने घेतला होता.

दरम्यान, राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा, अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.