Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज –  व्यावसायिक अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

तसेच विद्यार्थी व पालक यांच्याकडून मिळालेल्या विनंती अर्जांनुसार पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी बुधवार (दि. 20 जानेवारी 2021) पर्यंत मुदतवाढ करुन देण्यात आली आहे.

असे आहे सुधारित वेळापत्रक –

– 14 ते 20 जानेवारी 2021 – पहिल्या कॅप फेरीमधील जागा स्वीकारणे आणि प्रवेश घेणे.

– 21 जानेवारी 2021 – दुसऱ्या कॅप फेरीसाठी रिक्त जगाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.

– 21 ते 23 जानेवारी 2021 – कॅप फेरी 2 साठी ऑप्शन फॉर्म भरणे.

– 25 जानेवारी 2021 – दुसऱ्या कॅप फेरी साठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.

– 26 ते 30 जानेवारी 2021 – दुसऱ्या कॅप फेरीतील जागा स्वीकारणे आणि प्रवेश निश्चिती करणे.

_MPC_DIR_MPU_II

– 5 फेब्रुवारी 2021 – सर्व प्रकारच्या प्रवेशांसाठी कट ऑफची दिनांक.

– बी फार्म / डी फार्म साठी सुधारित वेळापत्रक पहिल्या कॅप फेरीमधील जागा स्वीकारणे आणि प्रवेश घेणे – 12 ते 20 जानेवारी 2021

– दुसऱ्या कॅप फेरीसाठी रिक्त जगाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे – 21 जानेवारी 2021,

– कॅप फेरी 2 साठी ऑप्शन फॉर्म भरणे – 21 ते 22 जानेवारी 2021

– दुसऱ्या कॅप फेरीसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे – 25 जानेवारी 2021

– दुसऱ्या कॅप फेरीतील जागा स्वीकारणे आणि प्रवेश निश्चिती करणे – 27 ते 29 जानेवारी 2021

– सर्व प्रकारच्या प्रवेशांसाठी कट ऑफ तारिख – 5 फेब्रुवारी 2021

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.