Mumbai news: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची गुप्त भेट

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची तयारी ?

एमपीसी न्यूज – राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज (शनिवारी)  मुंबईत गुप्त भेट झाली आहे. दुपारी दीड ते साडेतीन अशी दोन तास बैठक झाल्याची माहिती आहे. मराठी वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे एकत्रित महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सरकारचे नेतृत्व करत आहेत. शिवसेनेने पहिल्यांदाच मोठी भूमिका घेत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आपले विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन केले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची दोन तास भेट झाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का ?,  याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.