Mumbai News : जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन

एमपीसी न्यूज – जेष्ठ विनोदी अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन झाले आहे. अनेक सुप्रसिद्ध मराठी, हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. तसेच, कित्येक मालिका आणि नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

_MPC_DIR_MPU_II

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांनी बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश केला होता. त्यानंतर ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली.

‘जान जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.