Mumbai News : शिवसेना लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक

एमपीसी न्यूज: शिवसेना आता पश्चिम बंगालच्या राजकारणात उतरत असून तेथील विधानसभा निवडणूक लढवणार आहे. याची माहिती खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागांसाठी ही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा चर्चेत आली आहे.

‘वाट बघत असलेला अपडेट इथे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिवसेना पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे ठरले आहे. आम्ही लवकरच कोलकत्त्यात पोहोचू…जय हिंद, जय बांग्ला’, असे ट्विट संजय राऊतांनी केले आहे.

असे असले तरी शिवसेना पश्चिम बंगालमधील किती जागा लढवणार आहे, हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी शिवसेनेनी बिहारमधूनदेखील निवडणूक लढवली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.