Mumbai News : विकृतीचा कळस ! वापरलेला कंडोम घातला सापाच्या डोक्यात

एमपीसी न्यूज – सांगवीत रविवारी (दि.3) श्वानाला पोत्यात घालून जाळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता मानवी विकृतीचा असाच एक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने सापाच्या डोक्यात वापरलेला कंडोम घातला होता. चेहरा कंडोमने झाकल्यामुळे सापाची जगण्यासाठी धडपड सुरू होती. अखेर महिला सर्पमित्राने सापाची सुखरूप सुटका केली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मुंबईत कांदिवली पूर्वेला शनिवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ग्रीन मीडोस हाऊसिंग सोसायटी जवळ डोक्याला कोंडम घातलेला साप स्थानिक रहिवाश्याला दिसला. श्वास घेण्यास अडधळा होत असल्याने सापाची जगण्यासाठी धडपड सुरू होती.

त्या स्थानिक रहिवाशाने महिला सर्पमित्र मिता मालवणकर यांना फोन करून मदतीसाठी बोलवले.

मालवणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अज्ञाताने वापरलेला कंडोम सापाच्या चेहऱ्याभोवती गुंडाळलेला होता. मालवणकर यांनी सापाची त्या अवस्थेतून सुखरूप सुटका केली.

सर्प पकडण्यात प्रशिक्षित असलेल्या व्यक्तीने किंवा तज्ज्ञाने हे घाणेरडे कृत्य केल्याचा संशय मालवणकर यांनी व्यक्त केला. कारण सापाच्या चेहऱ्याभोवती कंडोम गुंडाळणे इतके सोपे नसल्याचे त्या म्हणाल्या.

सापाची सुटका केल्यानंतर पशूवैद्यकीय अधिकाऱ्याने सापाची तपासणी केली. उपचारानंतर त्या सापाला जंगलात सुरक्षित ठिकाणी पुन्हा सोडून देण्यात आले.

दरम्यान, या विकृत कृत्याचा सोशल मीडियावर सर्पमित्र आणि नागरिकांनी निषेध नोंदवला आहे. मानवी विकृतीचा हा कळस आहे असे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.