PCNTDA News : प्राधिकरणाचा विकसीत भाग महापालिकेत, तर अविकसीत भाग पीएमआरडीएत समाविष्ट होणार

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा विकसीत भाग पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत, तर अविकसीत भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पीएमआरडीएची आढावा बैठक संपन्न झाली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नगरविकास खात्याचे अधिकारी, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

या बैठकीत पीएमआरडीएच्या हद्दीत पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा विकसीत भाग पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत तर अविकसीत भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली.

तसेच शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो, रिंगरोड साठी भुसंपादनासाठी परवानगी आणि अतिरिक्त निधी संदर्भातही सविस्तर चर्चा देखील झाली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर सर्व प्रकल्पांची माहिती देणारे संगणकावर सादरीकरण करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.