Mumbai News : पाच ऑक्टोंबरपासून रेस्टॉरंट, बिअर बार सुरू होणार

एमपीसी न्यूज – राज्यात पाच ऑक्टोंबरपासून रेस्टॉरंट, हॉटेल्स, बार सुरू होणार आहेत. याबाबत अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने सरकारने रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे.

महाराष्ट्रात लाॅकडाऊन 31 ऑक्टोंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, नियम आणखी शिथिल करत 50 टक्के क्षमतेसह रेस्टॉरंट सुरू करता येणार आहेत. तसेच मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत काय सुरू होणार ?

* पाच ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेसह हाॅटेल्स, रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करता येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र नियमावली जाहीर केली जाणार आहे.

* राज्य सरकारनं राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

* मुंबई महानगर प्रदेशातील लोकल रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारनं मुंबईतील डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे.

* मुंबई महानगर प्रदेशात अर्थात एमएमआरडीए विभागात डबेवाल्यांना रेल्वेतून प्रवास करता येणार असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून क्यूआर कोड देण्यात येणार आहे.

* एमएमआरडीए विभागातील प्रोटोकॉल व कार्यपद्धतीनुसार पुणे विभागातील लोकल ट्रेन पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. पोलीस आयुक्त त्यासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.