Mumbai News : हॉटेल व्यवसायासाठी पर्यटन विभाग सुलभ धोरण आणणार : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात पर्यटन आणि हॉटेल व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतात तसेच राज्याला महसूलही  मिळतो. महाराष्ट्राचे निसर्गसौंदर्य, किनारी पर्यटन, तिर्थयात्रा, कृषि पर्यटन यामधील संधी ओळखून पर्यटन विभाग हॉटेल व्यवसायासाठी सुलभ धोरण आणणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

ओयो हॉटेल्स अँड होम्सच्या वतीने आयोजित वेबीनार मध्ये पर्यटन मंत्री ठाकरे बोलत होते. यामध्येपर्यटन आणि सांस्कृतिक कार्य प्रधानसचिव वलसा नायर सिंग, हॉटेल्स अँड होम्सचे संस्थापक मुख्य कार्यकारीअधिकारी रितेश अगरवाल, हॉटेल्स अँड होम्सचे दक्षिण आशिया विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांच्यासह राज्यभरातील 170 सदस्य हॉटेल सदस्यांनी वेबिनार मध्ये उपस्थिती लावली.

पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात येणाऱ्या पर्यटकांना जागतिक दर्जाचा अनुभव मिळावा, यासाठी धोरणनिश्चिती केली जात आहे. आमचा रोख हॉटेल व्यवसायातील उद्योजकांना उत्तेजन देण्यासाठी व्यवसायाला पूरक धोरणे अवलंबून पर्यटनाला गती देण्यावर भर दिला जाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.