Mumbai News : आदिवासी पाड्यातील बांधवांना छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वस्तूंचे वाटप करण्यात येणार

विद्यार्थी सेवा संघ माझगाव या संस्थेच्या वतीने करण्यात येणार शैक्षणिक वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज – माझगावच्या विद्यार्थी सेवा संघातर्फे डहाणू येथील आदिवासी पाड्यांना विविध वस्तूचे वाटप करण्यात येणार आहे. आज या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली व वाटप करण्यात येणाऱ्या वस्तूंची माहिती दिली. व संस्थेच्या एकूणच कार्यपद्धतीची देखील माहिती या संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिवलकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिली.

_MPC_DIR_MPU_II

विद्यार्थी सेवा संघ माझगाव ही संस्था गेली 35 वर्ष शैक्षणिक, सामाजिक, आणि कला क्षेत्रात कार्य करत आहेत. या संस्थेचे प्रमुख सल्लागार हे छगन भुजबळ हे आहेत तर उपाध्यक्ष म्हणून आ. पंकज भूजबळ कार्यभार पाहत आहेत. गेली अनेक वर्षे आमची संस्था ही आदिवासी भागातील पाड्यांवर विविध वस्तूंचे वाटप करते आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करते या माध्यमातून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आम्ही करतो. शैक्षणिक क्षेत्रात दहावी सराव परीक्षा, शैक्षणिक साहित्य वाटप असे काम देखील प्रत्येक वर्षी आमच्या संस्थेचे सल्लागार आदरणीय छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत असतो अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिवलकर आणि उपाध्यक्ष पंकज भुजबळ यांनी दिली.

येणाऱ्या 23 व 24 जानेवारीला विद्यार्थी सेवा संघ आणि पोद्दार शिक्षण संस्था मुंबई या दोन संस्थेच्या माध्यमातून वाणगाव, कापसी आणि डहाणू या भागात कपडे, शालेय वस्तू, औषधे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिवलकर, उपाध्यक्ष पंकज भुजबळ , सरचिटणीस राजन कोळंबकर, व महेश वाघ यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.