Mumbai News : ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं मुंबईत निधन

एमपीसी न्यूज – बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला (88) यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं. फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी शेअर केली आहे.

शशिकला यांचं पूर्ण नाव शशिकला जावळकर असं होतं. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1932 रोजी सोलापुरात झाला होता. 70 व्या दशकात त्यांनी मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.त्यांनी तब्बल 100 चित्रपटांमध्ये काम केलं.

एकापेक्षा एक नावाजलेल्या व श्रेष्ठ निर्मात्यांकडे त्यांनी काम केलं यात ‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ (2003) इत्यादी. शशिकलाने 2005 पर्यंत चित्रपटांत कामे केलीत.

2007 साली भारत सरकारने शशिकला यांच्या सिनेमातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ किताबाने गौरविलं, तसंच 2009 साली व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डही त्यांना प्रदान करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.