Mumbai News: अ‍ॅम्ब्युलन्स येण्याआधीच कोरोनाबाधित महिलेचे पलायन

Mumbai News: woman corona patient flee before ambulance comes महापालिका अधिकाऱ्यांनी याप्रकरणी आता वाळीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

एमपीसी न्यूज- वसईतील वाळीव पोलीस ठाणे परिसरात 4 ऑगस्ट रोजी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स पाठवली. परंतु, अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचण्या आधीच कोरोनाबाधित महिलेने पतीसह पलायन केल्याची घटना घडली. महापालिका अधिकाऱ्यांनी याप्रकरणी आता वाळीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या पेल्हार प्रभागाचे अधिकारी प्रसाद बर्वे यांनी धानीवबाग स्थित गांगडीपाडा येथील एक 24 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पोलिसांना सांगितले. महिलेला वसईतील अग्रवाल रुग्णालयात दाखल केले जाणार होते.

त्यासाठी डॉक्टरांनी त्यांना आणण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स पाठवली. परंतु, अ‍ॅम्ब्युलन्स घरी पोहोचेपर्यंत बाधित महिला आपल्या पतीबरोबर पळून गेली.

दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे विक्रमी 12248 नवे प्रकरणे समोर आली. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 5,15,332 पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत मृतांची एकूण संख्या 17,757 झाली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1,45,558 इतकी आहे. रविवारी 13,348 रुग्ण बरे झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.