Mumbai News : येरवडा, ठाणे, नागपूर, नाशिकचे कारागृह होणार पर्यटन केंद्र

गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा ; 26 जानेवारीला येरवडा कारागृहात होणार उदघाटन

एमपीसीन्यूज : राज्यात कारागृह पर्यटनाचा ( prisons tourist centers )प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला आहे. त्यासाठी प्रथम पुणे येथील येरवडा कारागृहाची ( Yerawada Prisons) निवड करण्यात आली असून २६ जानेवारी याचे रोजी उद्घाटन होणार आहे.कारागृहांना एक ऐतिहासिक समृद्ध वारसा (Historically rich heritage )लाभला असून तो वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यादृष्टीकोनातून विशेष प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

स्वातंत्र्य पूर्व काळात महात्मा गांधी यांच्यासह जवाहरलाल नेहरू ( Javaharlal Neharu), लोकमान्य टिळक ( Lokmannya Tilak), सरदार वल्लभभाई पटेल ( Sardar Vallabhbhai Patel) , सरोजिनी नायडू (Sarojini Naidu), स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) असे महापुरुष काही काळासाठी येथील कारागृहात स्थानबद्ध होते.

येरवडा कारागृहानंतर नाशिक, ठाणे, नागपूर कारागृहात टप्प्याटप्प्याने पर्यटन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख ( Home Minister Anil Deshmukh ) यांनी दिली. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक थोर नेत्यांनी पुण्यासह ठाणे आणि नाशिक मधील कारागृहात कारावास भोगला.

या कारागृहांना एक ऐतिहासिक समृद्ध वारसा लाभला असून तो वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यादृष्टीकोनातून विशेष प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून त्याची घोषणा देशमुख यांनी मुंबईत केली.

दक्षिण आशियात येरवडा हे पुण्यातील प्रमुख कारागृह आहे. त्यामुळे सुरुवात पुण्यापासून होत आहे. राज्यात कारागृह पर्यटनाचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यासाठी पुणे , ठाणे आणि नाशिकच्या कारागृहाची निवड करण्यात आली आहे.

इतिहासाचे अभ्यासक, त्याचबरोबर विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ही कारागृह भेट मोफत ठेवण्याची तयारी असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात होते, मात्र वयोगटानुसार शुल्क आकारले जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

दुपारी १२ ते ३ या कालावधीत कारागृहातील सध्याच्या कैद्यांना त्यांच्या कोठडीतच बंद ठेऊन केवळ पर्यटकांसाठी कारागृह खुले ठेवण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यातील प्रतिसाद पाहून राज्यातील इतर कारागृहात टप्याटप्याने य योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.