Corona vaccine News : शरद पवार यांनी घेतली कोरोना लस

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास पवारांनी रुग्णालयामध्ये येऊन लस घेतली.

आजपासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून त्याअंतर्गत 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिक 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

आज सकाळीच सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला. तर शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात आल्या आहेत.

लस घेण्यासाठी कोविनच्या संकेतस्थळ किंवा कोविन ॲपवरून नोंदणी करणं बंधनकारक आहे. त्यानंतर लसीकरणाचे केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती कळवली जाईल. लसीकरणासाठी सरकारी व खासगी लसीकरण केंद्रवर लस उपलब्ध करण्यात आली आहे. सरकारी आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण मोफत असेल, तर खासगी आरोग्य संस्थांमध्ये त्यासाठी 250 रुपये प्रति डोस प्रति शुल्क द्यावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.