Mumbai : ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे निधन

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर (वय 85) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. खाडिलकर हे दैनिक नवाकाळचे अनेक वर्षं संपादक होते. नवाकाळमधून महत्वाच्या घडामोडींवर त्यांनी लिहिलेले अग्रलेख खूप गाजले होते.  

आज दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी गिरगाव येथील दैनिक नवाकाळच्या कार्यालयात दुपारी 12 ते 2 दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या अनके मुलाखती अतिशय गाजल्या. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे माजी संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.