Mumbai: देशात कोरोनाचे 9 बळी; राज्यात 97 ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूमुळे देशभरातील नऊ जणांचा बळी गेला आहे. तर, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. आजपर्यंत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 97 झाली आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक 41 रुग्ण आढळले आहेत. तिघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशभरातील कोरोना बाधितांची संख्या ४६७ वर पोहचली असून, ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक 41 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि महापालिका हद्द निहाय रुग्णांचा तपशील

मुंबई – 41, मृत्यू 3
पुणे – 16
पिंपरी-चिंचवड – 12
नवी मुंबई, नागपूर, यवतमाळ, कल्याण- प्रत्येकी 4
सांगली – 3
अहमदनगर – 2
ठाणे, पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, सातारा प्रत्येकी 1
करोनाचे एकूण रुग्ण- 97
एकूण मृत्यू – 3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.