Mumbai: राज्यात कोरोनाचा दहावा बळी, मुंबईत 80 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंबईत शनिवारी मरण पावलेल्या एका 80 वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा दहा झाला आहे. सकाळी पुण्यातही एका 52 वर्षीय कोरोनाबाधित एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मुंबईतील फोर्टीज हॉस्पिटलमध्ये शनिवारी मृत्यू झालेला रुग्ण कोरोनाबाधित होता, असे स्पष्ट झाले आहे. या रुग्णाने कोणताही परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला कोरोना संसर्ग कशामुळे झाला असावा, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या व्यक्तीच्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्यात कोरोग्रस्तांचा आकडा 216 वर गेला आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या एकूण 39 जणांना घरी सोडले आहे.

देशात 1071 जणांना कोरोनाची बाधा, एकूण 29 जणांचा मृत्यू

देशात आतापर्यंत एकूण 1071 जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. गेल्या 24 तासांत राज्यात देशात कोरोनाचे नवे 92 रुग्ण आढळून आले. या कालावधीत चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने देशातील कोरोना बळींची संख्या वाढून 29 झाली आहे, अशी माहिती केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.