Mumbai: बाल मंच उज्जैन आणि नट रंगभूमी मुंबईच्या वतीने लहान मुलांसाठी ऑनलाइन कला महोत्सव

Mumbai: Online art festival for children on behalf of Bal Manch Ujjain and Nat Rangbhumi Mumbai

एमपीसी न्यूज – बाल मंच उज्जैन आणि नट रंगभूमी मुंबई आयोजित लहान मुलांसाठी ऑनलाइन कला फेस्टिवल येत्या रविवारी आयोजित करण्यात आले आहे. यात देशभरातून , विविध राज्यातून अनेक वयोगटातील मुले मुली आपली कला रविवारी 28 तारखेला 12 ते 6 या वेळेत सादर करणार आहेत, यात नृत्याच्या विविध प्रकारांपासून ते कलेचे विविध प्रकार इथे एका क्लिक वर पाहायला मिळणार आहेत.

सध्याच्या कोरोंना च्या संकट काळात प्रत्येकाला आपली कला जोपासण्याची ही सुवर्ण संधी मिळाली आहे , लहान मुलांच्या बाबतीत तर आपल्यातली कला ओळखण्यासाठी , त्यांना एक हक्काचं व्यासपीठ देण्याचा हा एक प्रयत्न आहे. सध्याच्या ऑनलाइन जगात हे सहज शक्यही आहे, अगदी आपल्या घरी राहून आपल्या कलेचे एकाच वेळी जगासाठी सादरीकरण करणे आणि आपल्याच वयातील गुणवान मुला मुलींना कला सादर करताना प्रत्यक्ष पाहणे, हा निश्चित एक वेगळा अनुभव असेल.

संस्थेने आधी घेतलेल्या अशाच प्रकारच्या उपक्रमाला 3000 बाल कलाकारांनी देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, हे विशेष. लोक या अशा वेगळ्या देशव्यापी उपक्रमाला निश्चित प्रतिसाद देतील, अशी आयोजकांना आशा आहे,फेसबुकच्या आर्ट images च्या पेज वर रविवारी दिवसभर कलेचा मनमुराद आनंद घेण्याची ही आयती संधीच प्राप्त झाली आहे.

या दोन्ही संस्था या अश्या प्रकारचे अनेक उपक्रम आजवर घेत आली आहे , पुढे ही अनेक उपक्रम आणण्याचा निर्धार नट रंगभूमीचे मनीष शिर्के आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी व्यक्त केला आहे. याला भेट देऊन या कलावंतांता प्रोत्साहन देण्यासाठी आपण ही सज्ज व्हायलाच हवे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.