Mumbai : विशेष रेल्वेमध्ये 1 जूनपासून सशुल्क मिळणार पॅकिंग जेवण

Mumbai: Packing meals will be available in special trains from June 1

एमपीसी न्यूज – रेल्वे विभागाकडून चालविल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेमध्ये 1 जूनपासून सशुल्क जेवण मिळणार आहे. हे जेवण पॅकिंग स्वरूपात मिळणार असून यासोबत पॅकिंग पाण्याच्या बाटल्या, चहा, कॉफी, शीत पेये देखील मिळणार आहेत.
मध्य रेल्वेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 12 मे पासून देशभर विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला या रेल्वेमध्ये कोणत्याही प्रकारचे जेवण, पाणी आणि अन्य खाद्यपदार्थ मिळत नव्हते. या विशेष रेल्वेमध्ये एसी कोच लावण्यात आलेले नाहीत.

दरम्यान, रेल्वे विभागाकडून संबंधित प्रवाशांना आपल्यासोबत प्रवासात लागणारे खाद्य पदार्थ आणि पाणी आणण्याचे आवाहन केले होते. आता 1 जून पासून केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता दिली आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने देखील एक पाऊल पुढे टाकले आहे.
विशेष रेल्वेमध्ये 1 जून पासून केवळ पॅकिंग पदार्थच मिळणार आहेत. रेडी टू ईट खाद्य, पाणी, चहा, कॉफी, पेय पदार्थ आदी पॅकिंग स्वरूपात मिळणार आहे. ही सुविधा पेंट्री कार, ट्रेन साईड वेडिंग आणि रेल्वे स्थनाकावरील आयआरसीटीसी, रेल्वे केटरिंग दुकानांमध्ये मिळणार आहे. यासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागणार आहेत.
याबाबत रेल्वे विभागाने दिलेली माहिती www.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर ट्राफिक वाणिज्य निदेशालयाच्या वाणिज्य परिपत्रकांमध्ये देखील पाहता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.