Mumbai : इंग्रजी न आल्यामुळे ‘या’ अभिनेत्रीला लोक गावठी म्हणायचे

एमपीसीन्यूज  : अक्षय कुमारच्या ‘बेबी’ या चित्रपटातून नावारुपास आलेली मधुरिमा तुली ही सुंदर चेहरा असणारी आणि संयत अभिनय करणारी नव्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री.  पण कधीकाळी इंग्रजी भाषा बोलता न आल्यामुळे तिला लोक गावठी म्हणून चिडवायचे, असा धक्कादायक अनुभव मधुरिमाने सांगितला.

‘मी उत्तरांचलमधील एका लहान गावातून आली आहे. शाळेत असताना अभ्यासामध्ये मी इतकी हुशार नव्हते. माझं इंग्रजी देखील चांगलं नव्हतं. त्यामुळे मला प्रचंड चिडवलं जायचं. इतकचं काय तर अभिनयसृष्टीत आल्यानंतरही इंग्रजी सुधारायला मला बराच वेळ लागला. कारण माझं लक्ष इंग्रजी ऐवजी उत्तम अभिनयाकडे होतं’.

‘अनेकदा ऑडिशनदरम्यान इंग्रजी न आल्यामुळे मला रिजेक्ट देखील करण्यात आलं आहे. अनेकांनी माझा पेहराव पाहून गावठी म्हणत माझी खिल्ली उडवली आहे. परंतु, अशा प्रकारच्या गोष्टींमुळे मी खचले नाही. मी स्वत:मध्ये सुधारणा केल्या’, असा अनुभव मधुरिमाने सांगतला.

मधुरिमाने अनेक अॅडस् मध्ये देखील काम केले आहे. त्यावेळी तिचे बोलके डोळे थोड्याशा वेळात देखील बरेच काही सांगून जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.