Mumbai : राष्ट्रवादीला धक्का ! शिवेंद्रराजे, कोळंबकर, नाईक, पिचड यांचे राजीनामे

उद्या मुंबईमध्ये भाजप प्रवेश

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यामधील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐरोलीतील आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड यांनी आपले आमदारकीचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. उद्या मुंबईमध्ये त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.

शिवेंद्रराजे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या साताऱ्यात भारतीय जनता पक्षाला मुसंडी मिळाली असून मतदारसंघात मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता येणे कठीण आहे. मतदारसंघातील लोकांची कामे व्हावीत यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून कोळंबकर काँग्रेसमध्ये नाराज होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण मध्य मुंबईतील युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार केला होता. अकोले मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांमुळे आपण भाजपत प्रवेश करत असल्याचे आमदार वैभव पिचड यांनी जाहीर केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.