Mumbai News : NIA कडून बारा तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक

एमपीसी न्यूज : एनआयएने मुंबई पोलीस दलात कार्यरत सचिन वाझे या अधिकाऱ्याला बारा तासांच्या चौकशीनंतर अटक केली. रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांसह स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. गाडीत जिलेटीनचा साठा होता. या प्रकरणी सचिन वाझे या अधिकाऱ्याला अटक झाली.

दरम्याना अशी माहिती समोर येते आहे की, स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणाच्या कटात 5-7 जणांचा समावेश होता. सूत्रांनुसार, NIA ने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊ शकते. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये खळबळ उडाली आहे. आता या घटनेची पाळमुळं कुठवर जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

एनआयएच्या तपासात आणखी एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे ठाणे याठिकाणाहून आणखी 3 जणांच्या अटकेची शक्यता आहे. याप्रकरणी इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाला अटक होऊ शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.