Mumbai -Pune Express Way : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे दरम्यान असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती (Mumbai -Pune Express Way ) मार्गावर ग्रॅन्टी बसविण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक बुधवारी (दि. 8) दुपारी दोन ते तीन या वेळेत घेतला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

Maval : मावळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर गुलाल अन भंडा-याची उधळण

7/00 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. बुधवारी दुपारी 2 ते 2.30 या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी 2.30 ते 3 या वेळेत मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.

काम पुर्ण झाल्यावर दुपारी 2.30 वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी 3 वाजता मुंबईहून पुण्याकडे येणारी (Mumbai -Pune Express Way) वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.