Lonavala News : पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर ट्रक व कंटेनरला भीषण आग

ट्रकमधील ड्रम फुटल्याने आगीचा भडका

एमपीसी न्यूज :  पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे वर किमी 37/600 या ठिकाणी साधारणपणे रात्री 12:20 वाजण्याच्या सुमारास (MH 46 BF 7713) हा कंटेनर मुंबईच्या दिशेने जात असताना ब्रेक फेल झाल्याने लेन क्रॉस करून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या (MH 12 MV 7004) या ट्रकला धडकला. या धडकेने दोन्ही गाड्यांनी पेट घेतला.

_MPC_DIR_MPU_II

यामध्ये ट्रकमधील ड्रम गरम होऊन फुटले व त्यांचा ब्लास्ट होऊ लागल्याने आग आटोक्यात आणण्यात यंत्रणेला पहाट उजाडली. अग्नीशमन यंत्रणेने पाण्याचा व फोमचा मारा करत ही आग विझवली व पहाटेच्या सुमारास अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली.

खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती समजताच खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या पथकासह आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य यंत्रणा, अफसकॉन कंपनी, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी मदतकार्य केले. खोपोली नगर पालिका, उत्तम गेलव्हा आणि अन्य काही अग्नीशमन यंत्रणेने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.